Tribal Pilgrims : कचारगड यात्रेवर CCTV ची नजर!

CCTV eyes on Kachargarh Yatra : आदिवासी बांधवांची गर्दी; सरकारचा सर्वांगीण विकासाचा शब्द

Salekasa Gondia हजारो आदिवासी बांधवांच्या गर्दीने कचारगड यात्रा बहरली आहे. तीन राज्यांच्या संगमावर असलेल्या या ठिकाणाला पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त आहे. पण या गर्दीमध्ये समाजकंटकही सामील असतात. श्रद्धेच्या ठिकाणी कुकृत्य करण्यासाठी ते सज्जच असतात. मात्र, प्रशासनाने संपूर्ण यात्रा CCTV ने कव्हर केली आहे. कुठल्याही कोपऱ्यात काही घडले तरीही ते CCTV मध्ये कैद होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके बुधवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देखील कचारगड यात्रेत दाखल होत आढावा घेतला. कचारगड हे देशभरातील आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. येथे आमच्या पूर्वजांचा वास आहे. या ठिकाणी देशातील १८ राज्यांतील आदिवासी भाविक लाखोंच्या संख्येने येतात. अशात या तीर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे, असं ते म्हणाले.

Gondia Police : दिड लाखांचा गांजा बेवारस पडून होता!

भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल. तसेच दर तीन महिन्यांनी येथे भेट देऊन आढावा घेण्यात येईल, असा शब्द मंत्री उईके यांनी दिला. ते दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभागी झाले.

केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी केंद्रीय मंत्री व खासदार फग्गनसिंह कुलस्ते, खासदार नामदेवराव किरसान, छत्तीसगड येथील खासदार भोजराज नाग, माजी खासदार अशोक नेते, आमदार संजय पुराम, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार हिना कावरे आदींनी यात्रेला हजेरी लावली आहे.

Swati Industries case : स्वाती इंडस्ट्रीजकडून रेकॉर्ड गायब?; करदात्यांना हेलपाटे!

कचारगड येथे माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांची व पूज्य देवी देवतांची पूजा करण्यासाठी आदिवासी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी धनेगाव ते कचारगड पाच किमीचा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. माघ पौर्णिमा हा दिवस भाविकांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे एकाच दिवशी लाखो भाविकांनी हजेरी लावली. कोयापूनेमी महोत्सवाची सुरुवात गोंडी धर्माचार्य रावेन ईनवाते यांनी केली. अध्यक्षस्थानी के. पी. प्रधान गोंड राजे वीरेंद्रशहा उईके यांच्यासह विविध राज्यांतील विशिष्ट मान्यवर उपस्थित होते.