-
Dr. Narendra Jadhav committee includes seven veterans : डॉ. नरेंद्र जाधव समितीत सात दिग्गजांचा समावेश
Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्रामुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. मनसेकडून मोठे आंदोलन उभारण्यात आले होते, तर शिवसेना ठाकरे गटाने देखील यात उडी घेतली होती. वाढता विरोध लक्षात घेता सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती आणि आता या समितीमध्ये सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत सात दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष भाषा सल्लागार समिती, डॉ. वामन केंद्रे, माजी संचालक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, डॉ. अपर्णा मॉदरस, शिक्षणतज्ज्ञ पुणे, सोनाली कुलकर्णी जोशी, भाषा विज्ञान प्रमुख डेक्कन कॉलेज पुणे, डॉ. मधुश्री सावजी, शिक्षणतज्ज्ञ छत्रपती संभाजीनगर, डॉ. भूषण शुक्ल, सुप्रसिद्ध बालमानसतज्ज्ञ आणि संजय यादव यांचा त्यात समावेश आहे.
Bacchu Kadu : शेतकऱ्यांची लूटवापसी संवाद सभा १९ सप्टेंबरला अकोल्यात
त्रिभाषा सूत्राविरोधात मनसेने राज्यात ठिकठिकाणी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट देखील सहभागी झाला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले होते. अखेर सरकारने वाढता विरोध पाहून मागील दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले होते.
Jayashri Shelke : सणासुदीच्या काळात रेशनकार्डधारकांना गहू वाटप करा
आता डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्रिभाषा धोरणाची दिशा आणि रूपरेषा निश्चित करणार आहे. या समितीचा अहवाल शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम घडवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
____








