Breaking

Tukaram Bidkar : माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे निधन

 

Former MLA Tukaram Bidkar passed away in accident : शिवर येथे अपघात; राजकीय क्षेत्रातून व्यक्त होतेय हळहळ

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादीसह एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. बिडकर हे मूर्तिजापूरचे आमदार तसेच विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष देखील होते.

बिडकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. एका सच्च्या सहकाऱ्याला गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी शिवरजवळ अपघात झाला. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेले मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष राजदत्त मानकर यांचा सुद्धा अपघातात मृत्यू झाला.

Maharashtra Congress : हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ!

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी माजी आमदार तुकाराम बिडकर शिवणी विमानतळावर गेले होते. भेट झाल्यानंतर परत येताना सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिवर येथे टेम्पोने बिडकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर असलेले बिडकर व मानकर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Kailas Vijayvargiya : बंगालमधील मदरशांमध्ये देशविरोधी शिक्षा दिली जाते !

माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित ‘डेबू’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर २०१४ मध्ये खैरलांजीच्या माथ्यावर, २०१७ मध्ये झरी, २०२२ मध्ये ‘तू फक्त हो म्हण’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली.

याशिवाय, शेतकरी आत्महत्या या संवेदनशील विषयावर आधारित ‘आसूड’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका निभावली होती. नेता ते अभिनेता अशी प्रवासगाथा त्यांनी आपल्या कारकीर्दीत साकारली