Breaking

Tushar Ghadigaonkar : अभिनेत्याने संपवलं स्वतःचं आयुष्य

Taking extreme measures because not getting work : काम मिळत नसल्याने उचलले टोकाचं पाऊल

Mumbai: मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायकनगोस्त समोर आली आहे. अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली. काम मिळत नसल्यामुळें त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती समोर येत आहे. या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा प्रसिद्ध अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केली आहे. अभिनेत्याने उचलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या तुषार घाडीगावकर याने गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

Bachchu Kadu : अन्नत्याग आंदोलनाचे फलित; धोरणात्मक निर्णय होणार !

तुषार घाडीगावकर मुंबई येथील भांडूपमध्ये वास्तव्याला होता. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.अभिनेता अंकुर वाढवे याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत तुषार यांच्या निधनाची माहिती दिली. काम मिळत नसल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचं अंकुर वाढवे याने पोस्टमध्ये सांगितलं आहे. अंकुर वाढवे याने तुषार याचा एक फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं. या आत्महत्येंबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

___