Breaking

Uday Samant : झिरवळांचे लाडक्या बहीणींच्या २१०० रुपयांवरून घुमजाव, उदय सामंत म्हणाले..

 

Narahari Jirwal refused to pay Rs 2,100 to Ladki Bahin : २१०० रुपये कधी द्यायचे, हे आर्थिक बजेट पाहून ठरवू, असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेले आहे

Nagpur : लाडक्या बहीणींना २१०० रुपये देऊ, असं कुणी म्हटलंच नव्हतं, असे म्हणत राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी महायुतीच्या निवडणुकीच्या अजेंड्यावरून घुमजाव केले. त्यावर आज (२७ एप्रिल) नागपुरात उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी विचारले असता, नरहरी झिरवळ काय बोलले, हे मला माहिती नाही. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल आधीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. निवडणुकीच्या अजेंड्याला पाच वर्षांचा कालावधी असतो, असे ते म्हणाले.

निवडणुकीनंतर लाडक्या बहीणींना २१०० रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. निवडणूक झाली, महायुती सत्तेत आली. पण या आश्वासनाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या आश्वासनाची वारंवार आठवण करून दिली. त्यानंतर २१०० रुपये कधी द्यायचे, हे आर्थिक बजेट पाहून ठरवू, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले. त्यानंतर लाडक्या बहीणींनी २१०० रुपये मिळतील, ही आशा मावळल्यागत दिसतेय, अशी टिका आता केली जात आहे.

Uday Samant : ज्यांचं अस्तित्व आम्ही संपवलं, त्यांच्या टिकेकडे काय लक्ष द्यायचं ?

मंत्री सामंत यांनी वैभव नाईक यांना ऑफर दिली आहे. याबद्दल विचारले असता, वैभव नाईक माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. आपल्या मित्रांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावं, चांगल्या लोकांसोबत काम करावं, येवढच मी म्हटलं होतं. शेवटी आमच्या पक्षात आमचे नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतात. ते जसं म्हणतील तसं करू, असे मंत्री सामंत म्हणाले.

Illegal sand smuggling: महसूल मंत्र्यांना व्हिडिओ कॉल, आमदारांनी live दाखविले अवैध रेतीसाठे!

कॅबीनेट सबकमिटीमध्ये जेव्हा मेगा प्रोजेक्ट जातो, त्याला ३ रुपयांपर्यंत सबसीडी दिली जाते. यासंदर्भात मी दिलीप वळसे पाटलांकडून माहिती घेणार आहे. ते राज्याचे ऊर्जामंत्री, गृहमंत्री राहून चुकलेले आहेत. विधानसभा अध्यपदही त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती घेऊनच पुढील कार्यवाही करू, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.