Shiv Sena demands removal of Manikrao Kokate from ministerial post : उद्धव गटाच्या नेत्यांचे तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन
Lonar शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून विधानसभेत पत्याचा खेळ (रमी) खेळणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी शिवसेना (उ. बा. ठा.) जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे यांनी तहसीलदारामार्फत राज्यपालांकडे केली. हे निवेदन ८ ऑगस्ट रोजी सादर करण्यात आले.
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु असे दिवास्वप्न दाखवण्यात आले. मात्र, या सरकारने अद्यापही शेतकरी कर्जमाफी केली नाही. शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे. कुठे गारपीट, कुठे अतिवृष्टी, कुठे ढगफुटी यामुळे शेतकरी उदध्वस्त झाला आहे व तो आत्महत्या करत आहे व निवडून दिलेले मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्याचा जुगार, रमी खेळतात.
NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी लागली कामाला, स्थानिक निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर
अश्या शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्री केले. एक मंत्रीपद काढून दुसरे मंत्रीपद देणे ही शिक्षा आहे का बहुमान, म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्री पदावरून बरखास्त करा अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला.
NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी लागली कामाला, स्थानिक निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे यांच्या सह शहर प्रमुख गजानन जाधव , तालुका संघटक विजय मोरे, महिला संघटिका तारामती जायभाये, शालिनीताई मोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर, प्रकाशभाऊ सानप, उपसरपंच रवींद्र सुटे, युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर, विभाग प्रमुख गोपाल मापारी, तानाजी अंभोरे, अमोल सुटे, विजय घोडके, मंगेश मोरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, अल्पसंख्यांक चे अशपाक खान, फहीम खान, उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.