Shiv Sena warns of hunger strike for the bridge on Mendhali Road : शिवसेनेचा इशारा; जीव धोक्यात घालून नदी पात्रातून जातात लोक
Malkapur लासुरा–मेंढळी रस्त्यावरील विश्ववगंगा नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे देण्यात आला आहे.
पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल; जिवावर उदार होऊन नदी पार
या मार्गावर असलेला पूल पावसामुळे वाहून गेल्याने, ग्रामस्थांना पावसाळ्यात नदी पात्रातून जीव धोक्यात घालून शेतात व घराकडे जावे लागत आहे. ही परिस्थिती अतिशय गंभीर असून, तात्काळ पूल दुरुस्तीची गरज असल्याचे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेत पाणंद रस्ते विकासासाठी मास्टर प्लान!
बांधकाम विभागासमोर आंदोलनाचा इशारा
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता सोळंके यांना देण्यात आलेल्या निवेदनात, पुलाच्या दुरुस्तीची मागणी करताना तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Ward structure in final stage : अमरावती जिल्हा परिषदेसाठी ५९ जागांवरच निवडणूक
शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
ही मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरिदास गणबास, उपशहरप्रमुख शकील जमादार, किसानसेना शहरप्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूकसेना शहरप्रमुख इमरान लकी, विभागप्रमुख चांद चव्हाण, तसेच शेख फरहान, जावेदखान, शेख मोहसीन (शेख छोटू), पुरुषोत्तम अढाव, रमेश अढाव, रामपाल राजपूत, शंकर बगाडे, भास्कर बगाडे, जितेंद्र पारस्कर आदींच्या वतीने करण्यात आली आहे.