Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसोबत जिल्हा नियोजन बैठकीत घुसू, शिवसेनेचा इशारा

Demand to declare a wet drought in Buldhana : बुलढाण्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Buldhana जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाने होत्याचं नव्हतं झालं असून शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

येत्या २५ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या डीपीडीसी बैठकीत बुलढाण्याचे पालकमंत्री व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील हजर राहणार आहेत. या बैठकीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी ठोस निर्णय न झाल्यास, शेतकऱ्यांसोबत थेट डीपीडीसी बैठकीत घुसू, असा थेट इशारा बुधवत यांनी दिला आहे.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकीचा कलगितुरा रंगणार!

२२ सप्टेंबरला बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, मढ, गुम्मी, इज्लापूर परिसरात ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान केले. बुधवत यांनी सहकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी “सरकारने मदत न केल्यास आम्हीच दोन हात करून मदत मिळवून देऊ” अशी ग्वाही दिली.

जिल्ह्यातील चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मलकापूर, शेगाव, नांदुरा तालुक्यांमध्येही अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीन, तूर, कापूस यांसह फळबागांचेही नुकसान झाले. काही ठिकाणी नदीकाठची शेती वाहून गेली असून, मनुष्यहानी व जनावरांचेही बळी गेले आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, फक्त पंचनाम्याची वाट पाहून थांबणे परवडणारे नाही. त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बुधवत यांनी केली.

Gram Rojgar Sevak : मानधन न मिळाल्याने ग्राम रोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन

या निवेदनावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक अनिल नरोटे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, शहरप्रमुख नारायण हेलगे, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.