MLAs will have to take an oath not to leave the party : पक्ष न सोडण्याचे वचन द्यावे लागणार; डॅमेज कंट्रोल सुरू
Nagpur माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav balasaheb thackeray यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला खिंडार पडण्याची पुन्हा शक्यता बळावली आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल सुरू करण्यात आले आहे. येत्या २० फेब्रुवारीला खासदारांची तर २५ फेब्रुवारीला आमदारांची बैठक आयोजित केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेनेतील असंतोष उफाळून येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांना आपला नेता मानता मातोश्रीवर टीका केली आहे. पुन्हा कोकणातील नेते आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे तातडीने त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला.
आता ही असंतोषाची लागण राज्यभर पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार व खासदारांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. शिवसेनेतील किमान पाच खासदार फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २० फेब्रुवारीला राज्यातील ९ खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला किती खासदार हजेरी लावतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Blast at Asian Fireworks : बाजारगाव परिसरात दीड वर्षात २२ कामगार ठार!
काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाला ठाकरे गटातील तीन खासदारांनी हजेरी लावली होती. यामुळे शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाला सुद्धा खासदार संजय दिना पाटील यांनी हजेरी लावून ठाकरे सेनेच्या निर्देशांचे उल्लंघन केले होते.
त्याचप्रमाणे राज्यातील २० आमदारांमध्ये नाराजी आहे. शिंदे सेनेकडे जाण्याचा विचार काहीजण करीत आहेत. यामुळे भास्कर जाधव यांनी आपल्याला नेतृत्वाचा पुरेसा वापर होत नसल्याची खंत व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आमदारांना एकजूट ठेवण्याचे मोठे आव्हान उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यासमोर उभे ठाकले आले.
या बैठकीत आमदार व खासदारांच्या भावना जाणून घेतल्या जाणार आहेत. यात एकजूट राहण्याची शपथ दिली जाणार असल्याचे समजते. यामुळे मातोश्रीशी आपण प्रामाणिक राहू, असे वचन या बैठकांमध्ये लोकप्रतिनिधींना द्यावे लागणार असल्याचे समजते.
Mahayuti Government : ‘माझी वसुंधरा’ अभियानात १ कोटीचा गैरव्यवहार!
भास्कर जाधवांची पोस्ट व्हायरल
या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांची एक्सवरील पोस्ट व्हायरल झाली आहे. यात त्यांनी एका नावेत असलेले प्राणी उड्या टाकून पाण्यातून बाहेर पडत असल्याचे दाखविले आहे. यावरून आमदार जाधव यांची नाराजी दूर झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे आमदार जाधव यांनी म्हटले आहे. र जाधव शिवसेनेतून बाहेर पडणार आहेत, असाच या पोस्टचा अर्थ लावला जात आहे.