Uddhav Balasaheb Thackeray : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरून केले आंदोलन!

Shiv Sena protest for farmers loan waiver: शिवसेना उबाठा महिला आघाडी आक्रमक; ईसोली शाखेचे उद्घाटन

Buldhana : भाजप सरकारकडून दिल्या गेलेल्या “सातबारा कोरा करू” या आश्वासनाचा फसवाफसवीत बदल झाल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला आघाडीने चिखली तालुक्यातील ईसोली येथे हजारो शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीसाठी अर्ज भरून घेतले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटनही करण्यात आले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात भाजप सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून राजकीय उपस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा समन्वयक व निवडणूक प्रमुख संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

Vijay Wadettiwar : टेबलावर दारूचा घोट अन् खालून पैशाची नोट !

कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेत्यांनी “भाजप सरकारने केवळ आश्वासनांची पेरणी केली; प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूकच झाली,” असा आरोप करत केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. कर्जमुक्तीचा लढा शिवसेनेच्या नेतृत्वात अधिक तीव्र होईल, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

Irregularities in solar project : सौर प्रकल्प घोटाळा प्रकरणाला राजकीय वळण?

उद्घाटनप्रसंगी चिखली उपतालुकाप्रमुख सुभाष आटोळे, माजी सरपंच दामूअण्णा येवले, तालुका संघटिका एड. रूपाली चौधरी, महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिताताई येवले यांच्यासह विठोबा गीते, सिताराम येवले, भीमराव गिरगुणे, सुनील शुक्ला, शहीदभाई, शेख इरफान, विठ्ठल जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन येवले, नवनियुक्त शाखाप्रमुख दादाराव पवार, उपशाखाप्रमुख श्रीकृष्ण पानसंबळ, युवा शाखाप्रमुख संदीप वाडेकर, युवा उपशाखाप्रमुख आकाश बांगर, प्रभाकर येवले आदी उपस्थित होते.

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद या उपक्रमास लाभला आहे. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील,” असा निर्धार या वेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन गोविंद येवले यांनी केले.