Breaking

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने केले मंथन; एकजूट ठेवण्याचे आवाहन

Shiv Sena Review election preparations : शिवसेना उपनेत्यांचा मंत्र; निवडणुकीचा आढावा

Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर विशेष नजर आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यावर भर देत आहे. अकोला येथेही उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. निवडणूक जिंकायची असेल तर एकजूट ठेवणे आवश्यक असल्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.

शिवसेनेला असलेला जनाधार अधिक बळकट करण्यासाठी एकजूट गरजेची आहे. सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. पक्षाचा विचार घराघरापर्यंत पोचवण्याकरिता अधिक प्रयास केले पाहिजे, असेही बार्शीटाकळीत आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली.

MLA Nitin Deshmukh : DPC बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करा, नाहीतर न्यायालयात जाऊ

या बैठकीला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अकोला जिल्हाप्रमुख मंगेश काळे, तालुकाप्रमुख गजानन मानतकर आणि शहर प्रमुख उमेश राऊत आदी मान्यवर नेते उपस्थित होते. या आढावा बैठकीत बार्शीटाकळीत असलेल्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेना व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीच्या तयारीचे आदेश व मार्गदर्शन या बैठकीत पक्ष नेत्यांनी दिले.

MLA Suresh Dhas : अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांवर अनियमिततेचा आरोप

मतदारसंघातील राजकीय घडामोडी, पक्षाचा जनाधारा अधिक मजबूत करण्‍यासंबंधीचे कार्यक्रम आणि निवडणुकीची रणनिती आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी पक्षाचा आदेश शिरोधारा असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आपापल्या भागाचा कारभार सक्षमपणे सांभाळला पाहिजे असं आवाहन केले. तालुकाप्रमुख गजानन मानतकर यांनीही सर्वांनी एकजूट दाखवून पक्षाचा विजय सुनिश्चित करण्‍याकरिता प्रयत्न केले पाहिजेत असं मत व्यक्त केले.

या आढावा बैठकीत बार्शीटाकळीत असलेल्या शिवसेनेचे असलेल्या प्रभावाचा अधिक विस्तार करून आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.