ShivSena took an oath to protect the Constitution : अकोला येथे उध्दव गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले संविधानाचे पूजन
Akola संविधानाचे पूजन करून शिवसेना उध्दव ठाकरे गटाने संविधान रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्यभर संविधान पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता अकोल्यातील मदनलाल धींग्रा चौक येथे शिवसेनेच्या अकोला जिल्हा शाखेतर्फे संविधान पूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी केले. त्यांच्या समवेत शहरप्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, जिल्हा संघटक सुरेंद्र विसपुते व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Youth Congress : ६० जणांच्या उचलबांगडीचा कुणाल राऊतांना फटका
संविधान पूजन व भारतमातेला वंदन या कार्यक्रमात लोकशाही व संविधान बचावाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये जिल्हाप्रमुख मंगेश काळे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हाप्रमुख तरुण बघेरे, जिल्हाप्रमुख युवासेना अभय खुमकर, आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.कार्यक्रमानंतर शिवसेना प्रसिद्धी प्रमुख योगेश गीते यांनी ही माहिती दिली.
Akash Fundkar : विविध योजनांचे लाभ वितरण व राष्ट्रीय मतदार दिन
कार्यक्रमाचा उद्देश:
संविधान पूजनाचा हा सोहळा संविधानाच्या महत्वावर प्रकाश टाकत, लोकशाहीची जपणूक आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आला, असे उध्दव गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.