Shivsena urges CCI for purchases : विभागप्रमुखांसोबत चर्चा; मागण्यांचे निवेदन सादर
Akola शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी व्हावी आणि खरेदीनंतर त्यांना त्वरित पैसे मिळावेत. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी भारतीय कापूस निगमच्या CCI अकोला विभागाचे प्रबंधक नीरज कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर चर्चा करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बंद असल्याबाबत विचारणा केली होती. प्रबंधकांनी सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खरेदी बंद असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी लवकरच उपाययोजना करून खरेदी पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांनी एकदा नोंदणी केल्यानंतर दुसऱ्यांदा सातबारा उताऱ्यावर नोंद होत नसल्याचा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर, कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या कापूस पेरणीसंदर्भात हमी दिल्यास खरेदी करता येईल, असे प्रबंधकांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस खरेदी सुरू ठेवण्याबाबत तसेच खरेदीनंतर त्यांचे पैसे त्वरित अदा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावर प्रबंधकांनी सर्व्हर डाऊन असल्यामुळे विलंब होत असल्याचे सांगितले. मात्र, एकदा सर्व्हर सुरळीत झाल्यास, शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित चुकारे जमा करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत incoming मोठी रांग!
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, विभागप्रमुख नंदू ढोरे, सर्कल प्रमुख गोपाल ठाकरे, प्रवीण ढोरे, देवानंद ढोणे, संजय कातखेडे, बद्रीनाथ शेंडे, सागर चौधरी, विश्वनाथ सोळंके, संतोष गावंडे, गजानन सरदार, शुभम गवई यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.