Breaking

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : अमरावतीत शिवसेना ठाकरे गटात भूकंप

७५ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा; आमदाराविरोधात नाराजी

Amravati शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील शिवसेना, युवासेना, सहकार आघाडी व शिव सहकार आदी संघटनांतील तब्बल ७५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पक्षाच्या अंतर्गत कार्यकारिणी निवडीत व दर्यापूर नूतन तालुकाप्रमुखांच्या निवडीत जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. असा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. आमदार गजानन लवटे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. कार्यकर्त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप यावेळी करण्यात आला. शिवाय, ज्या लोकांनी पक्षासाठी मेहनत घेतली नाही, अशांनाच नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचे सांगण्यात आले.

Additional Tribal Commissioner : मैदानात खेळा; कामाचा ताण दूर करा!

राजीनामे दिल्यानंतर हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणत्या पक्षात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दर्यापूर मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भक्कम ताकद आहे. गेल्या ३० वर्षांत हा मतदारसंघ प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राहिला आहे. मात्र, या राजीनाम्यांमुळे पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

“नूतन कार्यकारिणी घोषित करणे हे माझे काम नाही. जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून कार्यकारिणी निवडली जाते. मी कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षातून काढले नाही आणि काढणारही नाही. मी प्रथम शिवसैनिक आहे आणि नंतर आमदार,” असे स्पष्टीकरण आ. गजानन लवटे यांनी दिले आहे.

Dr. Pankaj Bhoyar : सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देणार

या घडामोडींमुळे दर्यापूरच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षातील पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.