Uddhav Balasaheb Thackeray : गाव असो वा गल्ली, शिवसेनेची शाखा पाहिजेच!

ठाकरे गटाचा निर्धार; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शोध सुरू

Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मजबुती देण्यासाठी आणि निष्ठावान, जहाल कार्यकर्ते तयार करण्यासाठी संघटना बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. “गाव तेथे शाखा, गल्ली तेथे शाखा, शाखा तेथे मजबूत वज्रमूठ” या तत्त्वावर संघटना उभी राहिली पाहिजे, असे मत शिवसेनेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमी शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक शाखेत किमान २० ते ४० संघटक मावळे तयार करणे गरजेचे आहे. शाखाप्रमुखांना धैर्य, पाठबळ आणि भक्कम समर्थन मिळाले पाहिजे.

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंसारखा विकासासाठी Passionate नेता बघितला नाही!

प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर, विभाग पातळीवर मजबूत नेतृत्व उभे राहिले पाहिजे. यापैकी मध्ये फक्त संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यात. माजी नागरसेवकांचा उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

शिवसेना हे भगव्या वादळासारखे उभे राहिले पाहिजे. पुन्हा एकदा नवे ज्वलंत आणि जहाल शिवसैनिक घडवणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जहाल आणि अन्यायाला वाचा फोडणारी सेना उभी करणे काळाची गरज आहे.

प्रसंगी मोडतोड करणारी, लढाऊ आणि जाज्वल्य शिवसैनिकांची नवी फळी उभी राहिली पाहिजे. कोण आला, कोण गेला, याला काहीही महत्त्व नाही; ज्याची संघटना मजबूत, त्याचा किल्ला मजबूत!

Nagpur police : ‘रिल्स बघू नको’ म्हटल्यामुळे मुलगा घर सोडून गेला !

शिवसैनिकांनी संघटीत होऊन प्रोत्साहन मिळवणे आणि पक्षासाठी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे.
यासाठी जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुखांनी संघटन मजबूत करण्यासाठी आघाडीवर राहिले पाहिजे.