Uddhav Thackeray group leaders resign : युवासेना प्रमुखाचाही राजीनामा; निवडणुकीनंतरचे पडसाद
Buldhana काँग्रेसनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाला बुलढाण्यात मोठा धक्का बसला आहे. युवासेना शहर प्रमुख सचिन रमेश परांडे आणि शिवसेना शहर प्रमुख हेमंत अशोकराव खेडेकर यांनी एकाच वेळी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजीनाम्याच्या पत्रांमध्ये शिवसेनेच्या विचारधारेवर निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी मेहनत घेतल्यानंतरही संघटनेतील अंतर्गत घडामोडींमुळे पद सोडत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Udhhav Balasaheb Thakrey : महावितरण कार्यालयात वाळलेल्या मक्याचा पेंढा फेकला!
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत नाराजीच्या चर्चा होत्या. मात्र, थेट दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे त्या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे दोन्ही माजी पदाधिकारी पुढे काय भूमिका घेणार, नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार का, की पक्षातच राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, या राजीनाम्यांवर शिवसेना जिल्हा नेतृत्व कोणती भूमिका घेते, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : अपघातात मृत्यू होऊन दोन वर्ष झाले, विम्यासाठी हेलपाटे सुरूच!
जिल्ह्यात आलबेल नाही
उद्धव ठाकरे गटात बुलढाणा जिल्ह्यात सारेकाही आलबेल नाही, हे सिद्ध झाले आहे. एकीकडे मलकापूर येथील कार्यकर्ते महावितरणच्या विरोधात आक्रमक आंदोलन करतात. तर त्याचवेळी जिल्ह्यातील दुसऱ्या शहरात पक्षाचे प्रमुख नेते राजीनामा देतात. विधानसभा निवडणुकीनंतरचे हे पडसाद असल्याचे मानले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नेत्यांनी ही भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे.