Breaking

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर, गजानन वाघ जिल्हाप्रमुख

Gajanan Wagh Shiv Sena District Chief : भोजने, पाटील, लहाने यांच्याकडे सहसंपर्क प्रमुखपद

Buldhana शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र व तालुका पातळीवरील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षबांधणी लक्षात घेता या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रांसाठी गजानन वाघ यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधून ठाकरे गटाने जुने आणि नवे कार्यकर्ते यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र, काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी आपले स्थान डावलल्याचा आक्षेप घेत राजीनामेही दिले आहेत. त्यामुळे संघटनात समन्वय राखण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर उभे राहिले आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटात नाराजीचा स्फोट; स्थानिक निवडणुकीत बसणार फटका?

तसेच खालीलप्रमाणे विधानसभा स्तरावरील अन्य नियुक्त्या घोषित करण्यात आल्या आहेत:

जिल्हा सहसंपर्कप्रमुख –
मलकापूर : वसंतराव भोजने
खामगाव व जळगाव जामोद : दत्ता पाटील
बुलढाणा व चिखली : प्रा. दत्तात्रय लहाने

जिल्हा समन्वयक तथा निवडणूक प्रमुख : संदीप शेळके
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख : गजानन धांडे
जिल्हा संघटक (बुलढाणा, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद) : अॅड. सुमित सरदार

उपजिल्हाप्रमुख –
बुलढाणा विधानसभा : लखन गाडेकर
चिखली विधानसभा : विलास सुरडकर
मलकापूर विधानसभा : गजानन ठोसर
विधानसभा संघटक / समन्वयक –
सिंदखेडराजा विधानसभा संघटक : दिलीप वाघ
बुलढाणा विधानसभा संघटक : सुनील घाटे
मेहकर विधानसभा समन्वयक : संजय वडतकर

तालुकाप्रमुख –
बुलढाणा : विजय इतवारे
लोणार : राजेंद्र बुधवत
मोताळा : विजय इंगळे
जळगाव जामोद : संतोष दांडगे
मलकापूर शहरप्रमुख : हरिदास गणबास

Local Body Elections : बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी निवडणुकीचा बिगुल!

तालुका संघटक –
बुलढाणा : श्याम सावळे
मेहकर : डॉ. नंदू देशमुख
लोणार : विजय मोरे

तालुका समन्वयक –
चिखली : बी.टी. म्हस्के, श्याम निकम
लोणार : तेजराव घायाळ