Breaking

Uddhav Balasaheb Thackrey Shivsena : ठाकरे गटाचा एल्गार; २ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा!

Protest for farmers issues : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना रस्त्यावर

Buldhana ‘सत्ता द्या, कर्जमाफी करू’ असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने तीन महिन्यांतच कर्जमाफीच्या मुद्द्यावर यु-टर्न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २ मे रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर रणरणत्या उन्हात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आली.

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, पक्ष प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, छगनदादा मेहेत्रे, डी. एस. लहाने, नंदु कऱ्हाडे, अ‍ॅड. सुमित सरदार, प्रा. आशिष रहाटे, संजीवनी वाघ, अशोक मामा गव्हाणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Harshawardhan Sapkal : काँग्रेस मैदानात; जातीय द्वेषाविरोधात थोपटणार दंड!

यावेळी वक्त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणतीही अट न लावता दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी केली होती. परंतु आजचे सरकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या मार्गावर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन महिन्यांतच सरसकट कर्जमाफी न देण्याचे स्पष्ट केले. ही शेतकऱ्यांच्या विश्वासाला धक्का देणारी बाब आहे.

बैठकीत काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २८ निष्पाप भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

Terrorist attack in Pahalgam : काळी फित बांधून भ्याड हल्ल्याचा निषेध!

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
विधानसभा निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन त्वरित पूर्ण करावे.
सोयाबीन, कापूस, मका इत्यादी शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा.
शेतकऱ्यांना सरसकट, अटीविना पीक विमा मिळावा.
तुषार व ठिबक सिंचनाच्या अनुदानाची तात्काळ अंमलबजावणी करावी.
वन्य प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी तार कंपाउंड उपलब्ध करून द्यावे.
शेतीसाठी मोफत वीज मिळावी आणि संपूर्ण वीजबिल माफ करावे.