BJP Minister Vijay Shah should be beaten with a shoes : आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे हिंदुत्ववादी, देश आपला मानतो
Mumbai : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टिका केली, तर लष्कर अधिकारी सोफिया कुरेशी यांचे कौतुक केले. भाजपचा मंत्री विजय शाह हा घराघरांत जाऊन सिंदूर वाटणार. या मंत्र्याला खरं तर भर रस्त्याच चाबकाने फोडला पाहिजे, असे म्हणत ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.
यासंदर्भात शिवसेनेच्या वर्धापन दिवस सोहळ्यात उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपवाल्यांच्या डोक्यात भलते भलते विचार येतात. मध्येच काय तर घराघरांत सिंदूर वाटण्याचे त्यांनी ठरवले आणि हा सिंदूर वाटण्याची जबाबदारी एक नालायक मंत्री विजय शाह याला दिली. खरं तर या भ्रष्ट मंत्र्याला जोड्यानं हाणलं पाहिजे. पण भाजपने त्याच्यावर अद्यापही कारवाई केली नाही. अन् हे लोक आमच्या आई – बहीणींना सिेंदूर वाटत होते. आमच्या बहिणी यांच्याकडून सिंदूर घेतील, हे त्यांना वाटलेच कसे ?
माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. तेव्हा आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे हिदुत्ववादी आहोत आणि हा देश आपला मानतो. देशासाठी बलिदान देणारा कुणीही असो. मग तो आमचा आहे. लष्करातील सोफिया कुरेशी या आपल्या भगिणी आहेत. आपल्याला त्यांचा गर्व आहे. भारताची बाजू मांडताना त्यांनी बाणेदारपणा दाखवला. त्याच सोफिया कुरेशी यांना हा शाह पाकिस्तानी म्हणतो, दहशतवाद्यांची बहीण म्हणतो. अशी गद्दार औलाद भाजपमध्ये आहे आणि आपण याच भाजपकडून देश सुधरण्याची आशा कशी करू शकतो, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.