Uddhav Thackeray : उबाठाच्या जिल्हाप्रमुखाला घेरण्याच्या प्रयत्नात भाजप !

BJP trying to surround Uddhav Thackeray’s district chief of Akola : अकोल्यात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट संघर्ष शिगेला !

Akola : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचे दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेवर वार करण्याची एकही संधी सोडल्या जात नाही. चुकीच्या पद्धतीने हे वार केले जात असल्याचा आरोप स्थानिक राजकीय वर्तुळात जोर धरू लागला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना लक्ष्य करून शिवसेनेचे नेतृत्व खिळखीळे करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये फायदा करून घेण्याचा डाव आखल्याचे बोलले जात आहे. अकोल्यातील हिंगणी गावातील वाद सरपंचाच्या माध्यमातून थेट जिल्हास्तरावर पोहोचवून भाजपकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

Eknath Shinde : काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा!

अकोला जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्ता मिळवता आली नाही. आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट भाजपसाठी सर्वाधिक अडचणीत आणणारा ठरू शकते. त्यामुळे भाजपने आतापासूनच शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा झालेला पराभवही त्यांना चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे बोलले जाते.

Raj Thackeray : आता आंदोलन थांबवायला हरकत नाही !

राजकीय समीकरणे सतत बदलत असताना, कधीकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेत आता राज्यभरातच नव्हे तर अकोल्यातही तणावाचे संबंध पाहायला मिळत आहेत. भाजप आमदार तथा प्रदेश महासचिव रणधीर सावरकर आणि शिवसेनेचे उपनेते नितीन देशमुख यांच्यातील वैचारिक मतभेद अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे अकोल्यातील भाजप विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर उभा ठाकला आहे.