Notice in old case, strict warning from the Commission : जुन्या प्रकरणात नोटीस, आयोगाचा कडक इशारा”
Mumbai : 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘सत्याचा मोर्चा’च्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीत वाढ झाली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मोर्च्याच्या आधीच ठाकरे यांच्यावर ही कारवाई झाल्याने विरोधकांमध्ये चर्चा रंगली आहे.
2018 मधील कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी सध्या कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. या चौकशीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सादर करावयाच्या काही कागदपत्रांबाबत आयोगाने पूर्वीच सूचना दिल्या होत्या. मात्र, ठाकरे यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आयोगाचा आरोप आहे.
Encounter case : जर पैसे खरोखर येत असतील तर कुटुंबाला मदत करीन
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सादर केलेली काही महत्त्वाची कागदपत्रे आयोगासमोर ठेवावीत, अशी मागणी केली होती. त्या कागदपत्रांमध्ये काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा आणि नेत्यांचा कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंध असल्याचा उल्लेख असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर चौकशी आयोगाने उद्धव ठाकरे यांना 12 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबर रोजी दोन वेळा नोटीस बजावली होती. त्यांना कागदपत्रे सादर करण्याची आणि आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी दिली होती. मात्र, ठाकरे यांनी दोन्ही नोटिशींना कोणताही प्रतिसाद दिला नाही.
Prakash Ambedkar : वाहने फोडायची असतील तर सत्ताधाऱ्यांची फोडा, आंबेडकर बरसले
यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी आयोगाकडे नवीन अर्ज दाखल करून उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली. त्यावर आता आयोगाने ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस बजावून विचारले आहे की, त्यांच्या विरोधात जामीन वॉरंट जारी करण्याची कारवाई का करू नये?
Sampada Munde suicide case : खाकी वर्दीतील वासनांध गिधाडं अन् भ्रष्टाचारानं बरबटलेली व्यवस्था !
या घडामोडींचा राजकीय अर्थ मोठा मानला जात आहे. कारण उद्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधक एकत्र येऊन ‘सत्याचा विराट मोर्चा’ काढणार आहेत. सरकारविरोधातील या शक्तीप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मिळालेली ही नोटीस राजकीय तापमान आणखी वाढवणारी ठरत आहे.
आता उद्धव ठाकरे चौकशी आयोगासमोर कोणता प्रतिसाद देतात आणि प्रकाश आंबेडकर यांच्या अर्जावर आयोग पुढील काय भूमिका घेतो, याकडे राज्यातील सर्व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
_____
 
             
		
