Shiv Sena leader joins BJP : माजी तालुकाप्रमुख डॉ. सावळेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
Buldhana बुलढाण्यात उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी तालुकाप्रमुख आणि नेते डॉ. मधुसूदन सावळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते शुक्रवारी सावळे यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी जिल्हा भाजप कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते उपस्थित होते. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात डॉ. सावळे यांचा मजबूत जनसंपर्क आहे. शिवसेनेत कार्यरत असताना त्यांनी अनेक वर्षे तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
याआधी दोन वेळा विधानसभेसाठी त्यांनी तयारी केली होती, मात्र अंतिम क्षणी त्यांचे तिकीट कटले होते. अखेर भाजपच्या विकासाभिमुख धोरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
डॉ. सावळे हे बुलडाणा मतदारसंघात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षे त्यांनी शिवसेनेत काम करत प्रभावी जनसंपर्क उभा केला आहे. त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली होती, मात्र शेवटच्या टप्प्यावर त्यांचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे असंतोषातून त्यांनी अखेर भाजपचा हात धरला.
त्यांच्या भाजप प्रवेशामुळे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता आहे. डॉ. सावळेंचा सामाजिक व व्यावसायिक गड मजबूत असल्याने त्यांचा प्रभाव भाजपच्या पारड्यात वजन वाढवणारा ठरणार आहे. तसेच, विद्यमान राजकीय समिकरणांवरही त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.
Heavy rain : अतिवृष्टी नसतानाही पूर आल्यास अधिकारीच राहणार जबाबदार !
या पार्श्वभूमीवर बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. सावळे यांच्या प्रवेशाने भाजपला बळ मिळाले असले तरी, शिवसेनेला नव्या रणनीतीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.