Irregularities in soybean procurement; Farmers still waiting : शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Amravati शासकीय किमान आधारभूत हमीभावानुसार नाफेडमार्फत करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदीत मोठ्या अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (Uddhavsaheb Balasaheb Thackeray) ने केला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आणि दोषींवर कारवाईसह शेतकऱ्यांना व्याजासहित चुकारे देण्याची मागणी केली.
अमरावती खरेदी-विक्री संस्था ही विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनची सब-एजन्ट म्हणून काम करत होती. संस्थेने ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केली होती, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळालेले नाहीत.
Shivsena Uddhav Balasaheb thakarey : शिवसेनेचे ‘एकला चलो’ छोट्या गावांमधून
शेतकऱ्यांनी यासंदर्भात चौकशी केल्यानंतर खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आले. यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करण्याची आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले असले तरी त्यांच्या हक्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. ३१ मार्चपूर्वी बँकेचे कृषी कर्ज न भरल्यास शेतकऱ्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळेच तातडीने चुकारे मिळावेत, अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी घेतली आहे.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेतील परस्पर पक्षप्रवेशांवर बाजोरियांचे मोठे विधान
गुडधे म्हणाले, “येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर अमरावती खरेदी-विक्री संघाचे कार्यालय फोडून टाकू.” या निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश बंड, कृऊबासचे उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ, तालुकाप्रमुख नितीन हटवार, रामदास बैलमारे, विजय तुळे, सौरभ देशमुख, सुरेशगिरी, मयूर गव्हाणे, प्रमोद वाघ, पंडित ठाकरे, नीलेश पारडे, रणजीत जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.