Breaking

Udhhav Balasaheb Thakrey : आरोपींना फाशीची शिक्षा द्या; शिवसेनेचे आंदोलन

Demand for Death penalty to the accused in Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मागणी

Akola सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अकोला शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) आंदोलन करण्यात आले. शिवसेना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या निर्देशानुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन बुधवारी (५ मार्च २०२५) अकोल्यातील शहीद मदनलाल धिंग्रा चौक करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी बस स्टँडजवळील उड्डाणपुलाखाली वाल्मीक कराडच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देत “वाल्मीक कराडला फाशी द्या” अशी घोषणाबाजी केली. तसेच, शासनाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Vanchit Bahujan Aghadi : ‘वंचित’च्या नेत्याच्या नातीचे अपहरण!

या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख रमेश गायकवाड, नगरसेवक शशी चोपडे, शहर संघटक सागर पुर्णेये, अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख राजेश दांडेकर, रवी भामरे, बार्शीटाकळी उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील, अविनाश मोरे, उपशहरप्रमुख नितीन बदरखे, आकाश दलाल, प्रतीक मानेकर, दीपक पानझडे, शिवम पुरोहित, प्रदीप काशीद, विभाग प्रमुख गोलू गावंडे, योगेश वाव्हाळ, वैद्यकीय समन्वयक नागेश इंगोले, रमेश सोनारगन, गजानन नवथळे उपस्थित होते.

Pravin Darekar : नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसराला मिळणार १० कोटी

मनोज अग्निहोत्री, रवी बडे, प्रदीप शिंदे, बाबुराव कुटे, सोनू पाटील, विजय प्रधान, राजू नारखडे, सौरभ डहाके, सागर वाघमारे, भानुदास गोंधळेकर, चेतन जैन, वैभव बोरचाटे, तुषार चतार, गौरव पाटणे, विठ्ठल काळदाते, अमोल पाटील, निलेश भोसले, नितीन गंगलवार, संदेश काजळकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.