Breaking

Udhhav Balasaheb Thakrey : महावितरण कार्यालयात वाळलेल्या मक्याचा पेंढा फेकला!

Dry corn straw thrown in Mahavitaran office : शिवसेना ठाकरे गट आक्रमक; मलकापूर येथे आंदोलन

Malkapur Khamgao शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध आहे. पण विजेअभावी पीक जळत आहे. महावितरणचे अधिकारी मात्र एसीमध्ये बसून आराम करत आहेत, असा आरोप करत शिवसेठा उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मलकापूरच्या महावितरण कार्यालयात वाळलेल्या मक्याचा पेंढा फेकून निषेध नोंदवला. त्यानंतर परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

कार्यकारी अभियंता तायडे कार्यालयात अनुपस्थित होते. त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले. काही वेळातच अभियंता उपस्थित झाले. पण तोपर्यंत संपूर्ण परिसर शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. राज्यात सुरू असलेल्या भारनियमनाच्या विरोधात तसेच विजेच्या विविध समस्यांसंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने मलकापूर येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून घेराव घालण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी केले.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : अपघातात मृत्यू होऊन दोन वर्ष झाले, विम्यासाठी हेलपाटे सुरूच!

गणेश सुशीर यांच्या मार्गदर्शनाखाली दुधलगाव, लोणवडी, आळंद येथील शेतकरी व शिवसैनिकांनी २७ फेब्रुवारी राेजी मलकापूर महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चा पाहताच सुरक्षा रक्षकांनी गेट बंद केले, मात्र शेतकऱ्यांनी कंपाउंडच्या जाळीतून आत प्रवेश मिळवला.

त्यानंतर शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन विजेच्या अनियमित पुरवठ्याबाबत जोरदार संताप व्यक्त केला. त्यांच्या तक्रारींमध्ये – भारनियमनाचा अन्यायकारक फटका, व्होल्टेज ड्रॉपमुळे होणारे नुकसानए डिपीच्या साहित्याचा विलंबए ३ महिन्यांपासून एकाच वेळापत्रकावर चालणारा विजेचा पुरवठा, निपाणा कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून होणारी दुर्लक्ष व टोलवाटोलवीयांचा समावेश होता.

Dr. Vinod Mohitkar : डॉ. विनोद मोहितकर यांना आयएसटीईकडून मानद फेलोशिप

कार्यकारी अभियंत्यांनी शिवसेना तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांच्याशी चर्चा करत पुढील उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले – दुधलगाव, आळंद येथील शेतकऱ्यांना आवश्यक साहित्य तत्काळ पुरवले जाईल. सर्व वीज समस्या दोन दिवसांत निकाली काढल्या जातील.हे आश्वासन मिळाल्यानंतर शिवसैनिक व शेतकरी शांत झाले.