Joining BJP, immediately reappointed as a government lawyer came limelight :भाजप प्रवेश, परवानंतर लगेच सरकारी वकील पदी पुनर्नियुक्तीने आले होते चर्चेत
Mumbai : पाकिस्तानी दहशतवादी कसाबला फासावर लटकावण्यात. मोलाची भूमिका बजावलेले सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध असलेले उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा सरकारने अधिसूचनेद्वारे करण्यात आली आहे. निकम यांच्यासह भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांचीही नामनिर्देशित खासदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांनी यापूर्वी बांगलादेशातील उच्चायुक्तांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. ते जानेवारी 2020 ते एप्रिल 2022 पर्यंत परराष्ट्र सचिव होते, कोविड -19 साथीच्या काळात भारताच्या राजनैतिक क्षेत्रात नेव्हिगेट करत होते. तर उज्वल निकम हे 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या दहशतवादी अजमल कसाब खटल्यासह आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या कामाबद्दल प्रसिद्ध आहेत.
Nitin Gadkari : सत्तेत आल्यावर लोक अहंकारी, गर्विष्ठ होतात सन्मान मागितल्याने मिळत नाही !
त्यांच्या कायदेविषयक कारकिर्दीत, निकम यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणां मध्ये महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले. संविधानाच्या कलम 80 अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकने केली आहेत, जी साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यास येते. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना नव्याने बक्षीस मिळाला आहे. निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भाजपने देशभक्त म्हणत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना मुंबईत उमेदवारी दिली होती. काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात रोमहर्षक लढत झाली. मात्र, या लढतीत उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. पण, पराभवानंतर अवघ्या 12 दिवसांतच सरकारने त्यांनी पुन्हा राज्याच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती केली. राज्य सरकारने निकम यांची फेरनियुक्ती केल्यामुळे विरोधकांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला होता.
Sanjay Raut : मी भाजपमध्ये येतो, मला मुख्यमंत्री करा शिंदेंचा अमित शहांना प्रस्ताव !
नियुक्तीनंतर उज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद संवाद साधला आणि अतिरेक्यांना सजा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेली भूमिका आणि केलेले प्रयत्न याबद्दल त्यांचे अभिनंदन करत पारित केली. त्यानंतर विरोधकांनी घेतलेल्या अतिरिक्त्यां संदर्भातील भूमिका वही त्यांनी टीका केली.