Breaking

Unauthorized Ration Cards : मोहिमेत आढळले ३३ हजारांवर अपात्र रेशनकार्डधारक!

Over 33,000 ration card holders ineligible : धनदांडगे असूनही घेत होते धान्याचा लाभ; रेशनकार्ड रद्द करण्याची कारवाई सुरू

Buldhana जिल्हा पुरवठा विभागातर्फे १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान राबविण्यात आलेल्या “अपात्र रेशनकार्डधारक शोध मोहिमेत” तब्बल ३३,९७१ अपात्र रेशनकार्डधारक आढळून आले आहेत. या सर्वांवर ‘ध्वजांकित लाभार्थी’ असा शेरा मारण्यात आला असून त्यांचे रेशनकार्ड रद्द करून शासकीय धान्याचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांकडून नमुना तपासणी फॉर्म भरून घेण्यात आले. यात वैध निवासाचा पुरावा जोडणे बंधनकारक होते. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहनाची मालकी, घरगुती मालमत्ता यासह सर्व आर्थिक तपशील नोंदविण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया स्थानिक रेशन दुकानदार व अधिकृत वितरण प्रतिनिधींच्या समन्वयाने पार पडली. अपात्र यादीत जास्त उत्पन्न गटातील, मृत, स्थलांतरित तसेच चारचाकी वाहनधारकांचा समावेश आहे.

Ajit Pawar : वाहतूक कोंडीवर अजित पवारांचा पहाटेचा दौरा

चारचाकी वाहन किंवा स्थिर उत्पन्न असलेल्या अनेक व्यक्तींनी रेशनचा लाभ गैरमार्गाने घेतल्याचे उघड झाले. मोहिमेचा उद्देश खऱ्या गरजूंनाच धान्याचा लाभ मिळावा आणि श्रीमंत किंवा पात्रता नसलेल्या लोकांकडून सार्वजनिक वितरण प्रणालीचा गैरवापर थांबवावा हा होता.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३,१९१ शासकीय अधिकारी-कर्मचारी रेशन धान्याचा लाभ घेत होते. त्यांचे रेशनकार्ड रद्द करून त्यांना एनपीएच योजनेत वळविण्यात आले आहे.

Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी

जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची संख्या

अंत्योदय अन्न योजना : ६३,७९३ रेशनकार्ड, २,६७,७०२ सदस्य

प्राधान्य कुटुंब गट : ३,९७,३९४ रेशनकार्ड, १६,४९,५०९ सदस्य

तालुकानिहाय ‘ध्वजांकित लाभार्थी’ संख्या
बुलढाणा – २,३६९, चिखली – ४,६३१, देऊळगाव राजा – १,१६७, जळगाव जामोद – २,६०२, खामगाव – ५,१४१, लोणार – २,२२७, मलकापूर – १,२५६, मेहकर – ३,४८४, मोताळा – १,८८४, नांदुरा – १,९४५, संग्रामपूर – १,७९७, शेगाव – २,६९५, सिंदखेडराजा – २,७७३.