Breaking

Union Bank : विम्यासाठी हिंदीत एफआयआर मागितला, मनसैनिकांचे आंदोलन !

Protest led by MNS District President Aditya Durugkar in front of Union Bank’s Friends Colony branch in Nagpur : युनियन बॅंकेने मागितली मनसे आणि बोपचे कुटुंबीयांची माफी

Nagpur : रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या योगेश बोपचे या तरूणाच्या अपघात विमा क्लेमसाठी युनियन बॅंकेने एफआयआरची कॉपी हिंदी भाषेमध्ये मागितली, असा आरोप बोपचे कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांकडून करण्यात आला. हा विमा योगेश बोपचे यांच्या युनियन बॅंक खात्याशी संलग्न होता. हिंदी भाषेत एफआयआर मागितल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांच्या नेतृत्वात युनियन बॅंकेच्या फ्रेन्डस कॉलनीतील शाखेसमोर आंदोलन केले.

या प्रकरणात मराठी भाषेचा अपमान झाल्याचा कुठलाही मुद्दा नसताना काही लोकांनी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बॅंकेच्या शाखेसमोर आंदोलन करणाऱ्या जवळपास ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेच्या आंदोलनानंतर युनियन बॅंकेने मनसे आणि बोपचे कुटुंबीयांची माफी मागितली आहे. त्यानंतर कुठे मनसेने आंदोलन मागे घेतले. व्यवहारासाठी मराठी ही राजभाषा म्हणून वापरली जाते. ऑनलाईन फसवणूक, एटीएम चोरी किंवा इतर प्रकरणांमध्ये मराठी एफआयआर स्विकारली जाते. मात्र विमा कंपनीचे मुख्यालय कोलकात्यामध्ये आहे. तेथील अधिकाऱ्यांना मराठी कळत नाही. त्यामुळे हिंदी किंवा इंग्रजी भाषांतर आवश्यक ठरते. त्यासोबत मुळ एफआयआरही जोडलेली असते, असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Tribal Pardhi Society : धक्कादायक.. पारधी समाजाच्या मुलांना शाळेत प्रवेश नाही !

रमेश बोपचे यांच्या प्रकरणातही असेच कारण देण्यात आले होते आणि हिंदीत एफआयआर मागवण्यात आली होती, असेही स्पष्टीकरण बॅंकेने दिले आहे. बोपचे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी एम्स हॉस्पीटलमध्ये नातेवाईकाला जेवणाचा डबा पोहोचवण्यासाठी योगेश गेला होता. दरम्यान रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला. एम्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असलेल्या नातेवाईकाचाही आज सकाळी मृत्यू झाला आहे. बोपचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी गेले असल्यामुळे यासंदर्भात त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. आजच्या आंदोलनात आदित्य दुरूगकर यांच्यासह शहराध्यक्ष चंदू लाडे आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.