Amit Shah in Nagpur today, heavy police deployment : राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे करणार भूमिपूजन
Nagpur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज नागपुरात येणार आहेत. सायंकाळी ८.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होईल. उद्या (ता. २६) वर्धा रोडवरील जामठा स्टेडीअमजवळील नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूटमधील कार्यक्रम आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजन समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत.
नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे जाणार आहेत. त्यामुळे नागपूर विमानतळ ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू रस्त्यावर पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त लावलेला आहे. काल (ता. २४) नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेतला आणि सुरक्षेच्या दृष्टीने संबंधितांना सुचना दिल्या.
Amravati Municipal Corporation : भाजपमधून निलंबित, आता शिंदे गटात जाणार!
अमित शाह यांच्या आगमनापासून ते त्यांच्या परत जाण्यापर्यंत ते शहराच्या ज्या – ज्या भागांत जातील, त्या प्रत्येक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ते परत जाणार आहेत. दरम्यान संघ मुख्यालय आणि रेशीमबागेतील स्मृतीस्थळालाही ते भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने तेथे तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.