Breaking

United Forum of Bank Unions : बँक कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार!

Bank employees on strike in March end : २४ व २५ मार्चला संपाचा इशारा; निदर्शनात ‘लढात तर टिकाल’च्या घोषणा

Akola केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) तर्फे २४ व २५ मार्च रोजी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी ४८ तासांच्या संपावर जाणार आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या महात्मा गांधी रोड शाखेसमोर निदर्शने करण्यात आली.

शुक्रवारी झालेल्या निदर्शनांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी ‘लढाल तर टिकाल’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील रिक्त पदे तातडीने भरणे, कामाचा आठवडा पाच दिवसांचा करणे, बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, ग्रॅच्युइटी मर्यादा २५ लाख रुपयांपर्यंत वाढवणे, तसेच परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) प्रणाली हटवणे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

Anup Dhotre, Randhir Sawarkar : वाजतगाजत निघाली नेत्यांची मिरवणूक!

बँक कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नोकऱ्या आउटसोर्सिंगद्वारे कमी केल्या जात आहेत, याचा यूएफबीयूने कडाडून विरोध केला. वित्तीय सेवा विभागाने (DFS) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सुक्ष्म व्यवस्थापन आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्याचा आरोप संघटनेने केला.

यूएफबीयूचे स्थानिक प्रवक्ते प्रवीण महाजन यांनी सांगितले की, “बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. इंडियन बँक्स असोसिएशनकडे (IBA) मागण्यांचे निवेदन दिले असले तरी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच २४ आणि २५ मार्चला बँक कर्मचारी ४८ तास संपावर राहतील.”

Chandrashekhar Bawankule : सिंचन आणि पुनर्वसनाची कामे Pending ठेवू नका!

या आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता. यूएफबीयूचे अ. भा. स्तराचे सहसचिव देविदास तुळजापूरकर यांनी कर्मचाऱ्यांनी संघटित राहून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. या संपामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी त्यांच्या महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.