Unknown call : मोबाईलवर अनोळखी कॉल आला की नंबरसोबत नावही दिसणार

CNAP service in the country; Government orders telecom companies : देशात CNAP सेवा; टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे आदेश

New Delhi : मोबाईलवर येणारे अनोळखी कॉल अनेकांसाठी मोठी समस्या ठरतात. अज्ञात क्रमांकावरून येणारे फोन अनेकदा त्रासदायक किंवा फसवणुकीचे असतात. पण आता या समस्येवर सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. लवकरच देशात Calling Name Presentation (CNAP) सेवा सुरू होणार असून, यानुसार मोबाईलवर कॉल आल्यास कॉल करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक आणि नाव दोन्ही मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे.

दूरसंचार विभागाने सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना Jio, Airtel, Vi आणि BSNL यांना या सेवेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सात दिवसांत किमान एका सर्कलमध्ये CNAP सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अज्ञात कॉल्समुळे होणारा त्रास आणि मोबाईलवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चक्काजाम आंदोलनात आमदार राजू बकाने अडकले

CNAP म्हणजे Calling Name Presentation ही एक सेवा आहे जी मोबाईलवर येणाऱ्या कॉलसोबत त्या क्रमांकाचा मालक असलेल्या व्यक्तीचं नाव दाखवते. सध्या ही सुविधा ट्रू कॉलर (Truecaller) सारख्या ॲपद्वारे मिळते, पण CNAP ही सुविधा थेट टेलिकॉम नेटवर्कद्वारे अधिकृतरीत्या उपलब्ध होणार आहे.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या शिफारशीनुसार, कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव हे त्या सिम कार्डच्या Customer Application Form (CAF) मध्ये नोंदवलेल्या नावावर आधारित असेल. म्हणजेच, सिम खरेदी करताना ग्राहकाने जे नाव दिलं आहे, तेच नाव कॉल करताना मोबाईल स्क्रीनवर झळकणार आहे.

TRAI ने फेब्रुवारी 2024 मध्येच CNAP संदर्भातील शिफारसी केंद्र सरकारकडे सादर केल्या होत्या. त्यानुसार, ही सेवा भारतीय टेलिकॉम नेटवर्कमध्ये “सप्लीमेंटरी सर्व्हिस” म्हणून समाविष्ट केली जाणार आहे. या सेवेचा आधार Calling Line Identification (CLI) प्रणालीवर असेल, ज्यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख क्रमांकासह नावाद्वारेही निश्चित होईल.

Local body election : निवडणुकीसाठी फक्त उत्साह नाही, ‘दारूगोळा’ही दाखवा

या सेवेमुळे अज्ञात किंवा स्पॅम कॉल ओळखणं सोपं होईल.
फसवणूक करणाऱ्या कॉल्सवर नियंत्रण मिळवता येईल.
मोबाईल वापरकर्त्यांचा सुरक्षिततेचा स्तर वाढेल.

लवकरच देशभरात या सेवेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार असून, मोबाईलवर अनोळखी नंबरचा कॉल येताच त्या व्यक्तीचं खरं नाव थेट स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे आता “हा नंबर कोणाचा?” हा प्रश्न विचारायची गरज उरणार नाही.