Damage to 4182 hectares of crops in 166 villages : अवकाळी पावसाचा तडाखा; दोघे जखमी, पाच गुरांचा मृत्यू
Buldhana जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे १३ तालुक्यांतील १६६ गावांमध्ये एकूण ४१८२ हेक्टरवरील रब्बी आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडणे, झाडे कोसळणे आणि घरांचे नुकसान यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेंदुर्जन येथील शाळेचे टिनपत्रे उडून शोभा खुशालराव शिंगणे आणि शिवराज शिंगणे हे दोघे गंभीर जखमी झाले. तर संग्रामपूर तालुक्यातील रुधाणा येथे झाड कोसळून घराची भिंत पडली आणि मोताळा तालुक्यातही एक घर पडल्याचे समोर आले आहे. खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात वीज पडून पाच जनावरे दगावली आहेत.
Chikhali Grampanchayat : सरपंचाच्या विरोधात बहुमताने अविश्वास!
२ एप्रिल रात्री ८ ते ३ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत जोरदार वादळी पाऊस झाला. या हवामान बदलाचा फटका बुलढाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना बसला आहे. पावसामुळे ज्वारी, मका, गहू, कांदा, कांदा बियाणे, भाजीपाला, पपई, केळी, संत्रा, लिंबू, आंबा व भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले.
नांदुरा, खामगाव, मोताळा आणि संग्रामपूर या तालुक्यांत सर्वाधिक हानी झाली असून १४ मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे कृषी विभागाने प्राथमिक अहवालात नमूद केले आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिके, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
Uddhav Thackeray : उबाठा बनले मुस्लिम ह्रदयसम्राट, घेतली वक्फ विरोधी भूमिका !
आंदोलनाचा इशारा
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द केले.