Possibility of rain with winds in 16 districts of the state : हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
Mumbai महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुढच्या ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये वादळीवााऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या १६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय पाच दिवसांत नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांच्या तापमानात विशेष बदल होणार नसल्याचेही हवामान विभागाने आहे.
Sunil tatkare : अशोक खरातला फाशी द्या; जलदगती न्यायालयात खटला चालवा सुनील तटकरेंची मागणी !
दरम्यान, शनिवारी रात्री भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे मका, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर अनेक भागांत वीजपुरवठाही खंडित झाल्याचं बघायला मिळालं. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसानं हजेरी लावली असून अकोला, अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पाऊस झाला.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ६२ गावे बाधित झाली असून ९५४ शेतकरी संकटात सापडले आहेत. सुमारे ८३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, गहू, केळी, पपई आणि आंबा या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी तातडीने भरपाईची मागणी केली आहे.
Satara zp election : ‘त्या’ महिलेला १० कोटीं दिल्याचा शशिकांत शिंदेंचा गंभीर दावा !
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गारपीट आणि जोरदार पावसामुळे मका, डाळिंब आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे कोसळली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाधित भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.








