Breaking

Urjanagar : मुख्य अभियंत्यांसोबतची चर्चा ऊर्जा नगरच्या विकासात ठरणार मैलाचा दगड !

 

Sudhir Mungantiwar is confident that discussions with the chief engineer will be a milestone in the development of Urja Nagar. : मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडा संदर्भातील प्रकल्प राबवण्याचे निर्देश

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जा नगरमध्ये विकास कामे करण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य अभियंत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत त्यांनी विविध कामांबाबत सूचना केल्या. ही चर्चा ऊर्जा नगरच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ऊर्जा नगरच्या विकासासाठी ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली. नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडा संदर्भातील प्रकल्प राबवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी मुख्य अभियंता विजय राठोड यांना दिले. आरओ मशीन त्वरीत दुरूस्त करण्यासाठी सीएसआर निधीतून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्थ करून देण्यात यावे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला वीज जोडणी देण्याचे काम प्राधान्याने करावे, असे आमदार मुनगंटीवार यांनी सुचवले.

Sand beach : लाभार्थ्यांचे नुकसान करू नका, आमदार मुनगंटीवार यांच्या सूचना

ऊर्जा नगर वसाहतीचे नुतणीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठीची नियोजनबद्ध कामे तात्काळ सुरु करावी. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी. परिसरातील युवकांसाठी अत्याधुनिक जीम उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावी, असेही आमदार मुनगंटीवार यांनी मुख्य अभियंता विजय राठोड यांना सांगितले.

Honor of the District Collector : सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा पुन्हा अव्वल !

सोबत पर्यावरण संवर्धनासाठी दोन लाख कडुलिंबाची झाडे ऊर्जा नगर परिसरात लावण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य अभियंत्यांसोबत झालेली चर्चा ऊर्जा नगर परिसराच्या विकासाला चालणा देणारी ठरणार आहे. बैठकीला रामपाल सिंग, अनिल डोंगरे, हनुमान काकडे उपस्थित होते.