Vanchit Bahujan Aghadi : रुग्णांची लुट थांबवा, नाहीतर तोडफोड आंदोलन

Aggressive over the functioning of private hospitals : वंचितचा इशारा, खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावरून आक्रमक

Buldhana शहरातील खाजगी रुग्णालयांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अवाजवी लूट, मनमानी आकारले जाणारे देयके आणि जबरदस्तीने वसुलीला आळा घालावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीने निवेदनात नमूद केले आहे की, बुलढाणा शहरातील रुग्णालयात जिल्ह्याभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु या रुग्णालयांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त चाचण्या, जबरदस्तीने आयसीयूमध्ये रुग्णांना ठेवणे, अकारण उचलले जाणारे बिल आणि रुग्ण दगावल्यास संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांना न देणे, असे अमानुष प्रकार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबांना उसनवारी व व्याजाने पैसे काढून कर्जबाजारी व्हावे लागत असल्याचेही आघाडीने सांगितले.

Heavy rain : जि.प.चे साडेचार हजार कर्मचारी पूरग्रस्तांसाठी देणार एक दिवसाचे वेतन

मुख्य मागण्या :

रुग्णालयांनी शुल्क फलक लावून पारदर्शकता ठेवावी.

सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून उपचाराचे फुटेज नातेवाईकांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावे.

डॉक्टरांच्या मालकीच्या मेडिकल स्टोअरमार्फत होणारी लूट थांबवावी.

प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक औषधे लिहिणे अनिवार्य करावे.

रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी.

Local Body elections : झीरो रोस्टर’चा धक्का, बदलाची आस धरलेल्यांच्या मनसुब्यांवर फिरणार पाणी

या मागण्या 30 दिवसांत पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी बुलढाणा शहरातील खाजगी दवाखान्यांवर तोडफोडीचे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी दिला आहे.