Allegations that the district in-charge is acting arbitrarily : जिल्हा प्रभारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. अनेकांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे, रिपब्लिकन पार्टीने सामाजिक संघटनांचा आधार घेणार असल्याचे म्हटले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. जिल्हा प्रभारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करून पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.
नागपूरचे जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षांसह पाच पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच सामूहिक राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. निवडणूकीच्या अगोदरच पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा प्रभाऱ्यांविरोधात संताप असून त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याने वंचितच्या अडचणींत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
Vidarbha Farmers : तर राज्यकर्त्यांना आपली घरं सांभाळणे कठीण होईल!
नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाणे, युवक आघाडीचे शहर अध्यक्ष प्रसन्ना दुरुगकर, वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे पदाधिकारी विवेक वानखेडे व राकेश गोसेकर तसेच युवा शहर प्रवक्ते अभय जोशी यांनी सोमवारी रविभवन येथे पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामा देण्याची घोषणा केली. यापैकी जोशी सोडले तर चारही पदाधिकाऱ्यांना पक्षाने रविवारीच पक्षातून निलंबित केले आहे.
यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, आमची नियुक्ती ही प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी केली आहे, त्यामुळे तेच आम्हाला पक्षातून काढू शकतात. आम्हाला पक्षातून काढल्याचे लेटर जयांच्या नावाने निघाले त्यांना तो अधिकारच नाही. आम्ही सामूहिक राजीनामे देत असल्याचे कळताच हा प्रकार झाला. मुळात पक्षात कुशल मेश्राम यांची मनमानी सुरू आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : रस्त्यांची दुरावस्था; शिवसेनेने दिला अभियंत्याला अल्टिमेटम
त्यांच्यासोबतच आयटी सेलचे सिद्धांत पाटील, अजय सहारे आणि धम्मदीप लोखंडे यांची त्यांना साथ आहे. हे सर्व मिळून गटबाजी करतात. स्थानिक स्तरावर ओबीसी नेतृत्व निर्माण होऊ देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.