Breaking

Vanchit Bahujan Aghadi : अमृतसरमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

Desecration of Dr. Ambedkar’s statue in Amritsar : अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

Akola अमृतसर (पंजाब) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हा प्रकार करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचितचे कार्यकर्ते आक्रम झाले आहेत. वंचित बहुजन आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.

SHivaji Maharaj’s Waghnakh : वाघनखांसाठी ‘अजब बंगला’ सज्ज!

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा. आरोपींसह या कटातील मास्टरमाईंडला शोधून तात्काळ अटक करावी. फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, अशा मागण्या वंचितने केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनात वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव राजेंद्र पातोडे, श्रीकांत घोगरे, आम्रपाली खंडारे, मजहर खान, गजानन गवई, सुनील फाटकर, निलोफर शहा, अशोक दारोकार, चरण इंगळे, किशोर जामणीक, गोरसिंग राठोड, पवन बुटे, सुनील पाटील, विकास सदाशिव, दीपक सावंत, मीनाताई बावणे, लक्ष्मीताई वानखडे, शोभाताई शेळके, मंदाताई शिरसाट, तेजस्विनी बागडे यांची उपस्थिती होती.

MLA Sudhakar Adbale : दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा तापणार?

गीता गवई, रोशन फुंडकर, सुरेंद्र ओईबे, राहुल लव्हाळे, आकाश शिरसाट, जय तायडे, संजय बुध, एड. मीनल मेंढे, कौशल्या साबळे, दुर्गा अवचार, प्रदीप पळसपगार, शंकर सतीश चोपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने आपली तीव्र भावना व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.