Kidnapping of the granddaughter of the leader of ‘Vanchit’ : मुलगी सुखरूप सापडली; अपहरण नाट्यावर पूर्णविराम
Akola: वंचित बहुजन आघाडीच्या महिला नेत्याच्या नातीच्या अपहरणाच्या घटनेवर मंगळवारी रात्री उशिरा पडदा पडला. कृषी नगर भागातील नामांकित इंग्रजी शाळेच्या परिसरातून १२ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र, पोलिसांच्या तातडीच्या तपासानंतर मुलगी सुखरूप सापडली आणि या अपहरण नाट्यावर पूर्णविराम लागला.
मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कृषी नगर भागातील एका नामांकित शाळेतून वंचित बहुजन आघाडीच्या महिला नेत्याच्या नातीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तातडीने तपासाची मागणी केली.
Pravin Darekar : नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसराला मिळणार १० कोटी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी सिव्हिल लाईन पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार विशेष पथके गठित करून शोधमोहीम राबवण्यात आली. शाळेच्या तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. अखेर, खडकी परिसरात पोलीस पोहोचले असता रात्री उशिरा मुलगी सुखरूप आढळून आली.
मंगळवारी दुपारी कृषी नगरातील नामांकित शाळेतून मुलगी बेपत्ता झाली होती. सुरुवातीला कुटुंबीयांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार ही अपहरणाची घटना असल्याचे वाटत होते. मात्र, पुढील तपासात वेगळेच सत्य समोर आले. कुटुंबीयांनी रागवल्यामुळे मुलगी घरातून निघून गेली होती. पोलिसांनी शोधमोहीम वेगवान केल्यानंतर रात्री उशिरा ती सुखरूप आढळली. या घटनेचे गूढ उलगडल्यानंतर मुलगी सुरक्षित सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलीचा त्वरित शोध घेण्याची मागणी केली. सुरुवातीला प्रकरण अपहरणाचे असल्याचे भासल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. संपूर्ण पोलीस दल मुलीच्या शोधात गुंतले होते. अखेर, मुलगी सुखरूप सापडल्यानंतर परिस्थिती शांत झाली.