Breaking

Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीच्या प्रश्नांसाठी अकोलेकर पोहोचले मुंबईत!

Protest in Mumbai to implement water tax Abhay scheme : अभय योजनेच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन

Akola : अकोला शहरातील नागरिकांना अनियमित आणि मोठ्या रकमेच्या पाणीपट्टी बिलांचा सामना करावा लागत आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांच्या नेतृत्वाखाली १७ मार्च २०२५ पासून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला आझाद मैदानावर मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नागरिकांची प्रमुख मागणी २०१६-१७ ते २०२४-२५ या कालावधीतील पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याची आहे. या योजनेअंतर्गत, अनियमित बिलिंगमुळे नागरिकांवर आलेला आर्थिक बोजा कमी करण्याची मागणी होत आहे. २०१६ मध्ये अकोला महानगरपालिकेने शहरात पाणी मीटर बसवले, मात्र बिलिंग प्रक्रिया अनियमित राहिली.

Nana Patole : नानांनी सांगितलं, न्यायालयाची डुप्लीकेट ऑर्डर काढली, अध्यक्ष म्हणाले गंभीर आहे!

परिणामी, सुमारे ५०,००० नळधारकांना ५ ते १० वर्षांची मोठ्या रकमेची एकत्रित देयके पाठवण्यात आली. यामुळे नागरिकांवर अनावश्यक आर्थिक ओझे पडले आहे. महानगरपालिकेची पाणीपट्टी थकबाकी ६० कोटींहून अधिक झाली आहे.

मागणीनुसार, मागील ६ वर्षांसाठी प्रति वर्ष १,००० रुपये निश्चित करून अभय योजना लागू करावी. भविष्यात नियमित आणि अचूक बिलिंग प्रणाली लागू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदने देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

पाणीपट्टी आकारणी करताना ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’च्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. अनियमित बिलिंग आणि त्रुटींसाठी स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vijay Wadettiwar : वडेट्टीवार संतापले; म्हणाले, हमीभाव खड्ड्यात गेला का?

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २३२३ चे कलम १६८ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ६८ अन्वये निलेश देव यांना मंत्रालयात ठिय्या आंदोलनास पोलिसांनी अटकाव केला. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. मात्र, अकोल्यातील नागरिकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवले आहे.