Vanchit Bahujan Aghadi : “आता आमदार-खासदारांना तेल लावा, स्वराज्यात सत्ता वंचितांची आणा!”

Rally Held Under the Leadership of Sujat Ambedkar : सुजात आंबेडकर यांचा निर्धार मेळाव्यात नारा; शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला

Varvat Bakal मागासलेल्या संग्रामपूर तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षावर तीव्र शब्दात प्रहार करत, “आपण निवडून दिलेले आमदार-खासदार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात; आता त्यांना तेल लावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणा!” असे ठाम आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि युवानेते सुजातदादा आंबेडकर यांनी केले.

ते वरवट बकाल येथील जेतवण बुद्धविहार परिसरात “निर्धार मेळावा” या कार्यक्रमात बोलत होते. या मेळाव्याचे आयोजन वंचित बहुजन आघाडी, संग्रामपूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.

Sharad Pawar : साहेब, एकटेपण सहन होत नाही, पत्नी मिळवून द्या!

सुजात आंबेडकर म्हणाले की, “ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे सोडवायचे असतील, तर सत्तेत वंचित समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. हे प्रतिनिधित्व मिळवण्याची एकमेव संधी म्हणजे वंचित बहुजन आघाडी.”