Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडी स्वबळावरच रिंगणात!

Vanchit Bahujan Aghadi to Contest on Its Own Strength : विजयाचा बिगुल मेहकरातून, बैठीकीतून कामाला लागण्याचे आवाहन

Mehkar वंचित बहुजन आघाडी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार असून, प्रत्येक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

मेहकर येथील स्थानिक विश्रामगृहात तालुकाध्यक्ष शे. मोबीन शे. याशीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अॅड. वानखेडे बोलत होते. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांचे सक्रिय योगदान आणि आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Food and drugs supply department : गहू गायब, ज्वारीची एन्ट्री! जेवणाच्या ताटात बदलले दिवाळीचे मेनू

अॅड. वानखेडे यांनी सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही सामाजिक न्याय, समता आणि संविधानाच्या मूल्यांवर उभी राहिलेली चळवळ आहे. सत्ताधाऱ्यांच्या अपयशाविरोधात जनता सजग झाली असून, आता सत्ता परिवर्तनाचा निर्णायक काळ आला आहे.”

बैठकीत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पक्षाचा ताबा मिळविण्यासाठी ठोस नियोजन आखण्यात आले. पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस तालुकाध्यक्ष शे. मोबीन शे. याशीन, अॅड. बबन वानखेडे, प्रा. आबाराव वाघ, सिध्दार्थ अवसरमोल, दीपक पाडमुख, राहुल पाडमुख, सिधदोदन सरदार, कविराज पाखरे, प्रा. जी. डी. तावडे, सुखदेव बोरकर, शे. मुकीम शे. जलाल, जितेंद्र दाभाडे, देवानंद शेजुळ, प्रा. विलास शेजुळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Vidarbha farmers : अवैध सावकारांकडील ७४ हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत

यावेळी किरण अंभोरे, वसुदेव बोरकर, दीपक पाडमुख, शुदोधन सरदार आणि मिना रमेश शिवाजी यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. बैठकीच्या शेवटी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी “वंचितांचा हक्क – जनतेचा आवाज” अशा घोषणा देत निवडणुकीच्या तयारीचा शुभारंभ केला.