Vanchit Bahujan Aghadi will fight the election on its own : जिल्हा आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Washim वंचित बहुजन आघाडीने आगामी नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. वाशिम येथे पार पडलेल्या जिल्हा आढावा बैठक आणि स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाध्यक्ष किरण गिन्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई इंगळे, उपाध्यक्ष मेघाताई डोंगरे, जिल्हा सचिव विनोद भगत, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, आणि अनेक प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, तालुका, आणि सर्कल स्तरावरील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Minister Akash Fundkar : सर्वसमावेशक विकासाच्या प्रक्रियेला गती
बैठकीत आघाडीच्या आगामी निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंगरूळपीर येथील युवा उद्योजक गुणवंता किसनराव गहूले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्धार केला आहे. वाशिम जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला.
याआधी झालेल्या चुकांपासून बोध घेऊन पुढील निवडणुकांमध्ये अधिक चांगली रणनीती राबवली जाईल. पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे आणि आघाडीला यश मिळवून द्यावे. बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून आघाडीच्या भविष्यातील वाटचालीसाठी पाठिंबा व्यक्त केला.
Minister of State Indranil Naik : प्रत्येकाने वाचावे भारताचे संविधान
वंचित बहुजन आघाडी आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावरच लढेल. मतदारांचा विश्वास हेच पक्षाचे बलस्थान असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी अधिक यशस्वी होईल, असा विश्वास आघाडीला आहे. वंचित बहुजन आघाडीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे, असा अंदाज व्यक्त होत आहे.