Vanchit Bahujan Aghadi : कमीशनखोरी थांबवा, नाहीतर अधिकाऱ्यांना काळे फासू

Warning to blacken officials’ faces if commission-taking is not stopped : वंचित बहुजन आघाडीचा इशारा, कार्यकारी अभियंत्यावर आरोप

Akola जिल्हा परिषद बांधकाम विभागात कामवाटपात मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी सुरू असून विशिष्ट कंत्राटदारांसाठी स्वतंत्र यादी तयार करून मनमानी सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. ही अनागोंदी थांबवली नाही, तर कार्यकारी अभियंत्यास काळे फासण्याचा इशारा त्यांनी दिला.

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता कार्यालयात वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. ४ नोव्हेंबर रोजी संविधान भवनात झालेल्या कामवाटप समितीच्या बैठकीत २२ कामांसाठी केवळ ३३ लाख रुपये किंमत दाखवून प्रत्यक्षात जवळपास ७ कोटी ७० लाख रुपयांची कामे छुप्या पद्धतीने वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

Parth Pawar Case : कुटुंब आणि राजकारण वेगळे, विचारधारा महत्त्वाची

अकोट तालुक्यातील रामापुर (धारूळ), अकोलीजहाँ तसेच तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार, भिली, अडगाव बु. ग्रामपंचायतींतील विकासकामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दिल्यानंतरही टेंडर बुक देताना कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुधारणेची मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पातोडे यांनी दिला.

Nitesh Rane : राज्य अल्पसंख्यांक आयोग नितेश राणेंना नोटीस पाठवणार

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, माजी जि.प. सदस्य गोपाल कोल्हे, सचिन शिराळे, जय रामा तायडे, नागेश उमाळे, वैभव खडसे, सुगत डोंगरे, श्रीकृष्ण देवकुंभ, राजदर खान, अमोल डोंगरे आकाश गवई आदी उपस्थित होते.