Breaking

Vanchit Bahujan Aghadi : माेताळा तालुक्यातील अनेक ग्रामसेवक कागदाेपत्रीच मुख्यालयी

Demand for action against Gram Sevaks : मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची वंचितची मागणी

Motala तालुक्यातील ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी कागदोपत्री मुख्यालयी हजर राहतात; मात्र प्रत्यक्षात ते मुख्यालयी राहत नसून शासनाची फसवणूक करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. मुख्यालयी हजर न राहणाऱ्या ग्रामसेवकांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हानेते प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे. परंतु, ते केवळ कागदोपत्री मुख्यालय दाखवून शासनाची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची चौकशी पंचायत समिती स्तरावर समिती गठीत करून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Home Ministery : १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; एका अधिकाऱ्याला वर्षभराची स्थगिती!

चौकशीत मुख्यालयी वास्तव्याचा पुरावा म्हणून ग्रामपंचायतीचे ठराव, करारनामा, भाडेपट्टा तपासण्यात यावा. जर वास्तव्याचे पुरावे खोटे ठरले, तर संबंधितांकडून रुजू झाल्यापासून आजपर्यंतचे संपूर्ण घरभाडे वसूल करण्यात यावे. तसेच शासनाची दिशाभूल केल्याबद्दल प्रशासकीय कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

Uddhav Balasaheb Thackarey : माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवा, शिवसेनेची मागणी

निवेदनावर जिल्हानेते प्रशांत वाघोदे, जी. एन. अहिरे, डब्लू. डी. वानखेडे, गौतम थाटे, नवनीत शिरसाठ, रविराज खराटे, नितीन शिरसाठ, राष्ट्रपाल खंडारे, शेषराव बोदडे, सचिन मेढे, गौतम गुरचवडे, प्रशांत जाधव, भास्कर वाकोडे, रोहन सावडे, वैभव वानखेडे, सागर इंगळे, मंगेश पाटोळे, रूपाजी खराटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.