Former Zilla Parishad President joins NCP Ajit Pawar : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीला धक्का; माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचाही समावेश
Akola स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष साहेब मूर्तिजापूर मतदारसंघातून दोन वेळा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेल्या महिला नेत्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील ‘एमसीए द लाउंज’ येथे पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या माजी जि.प. अध्यक्षा संध्या हरिभाऊ वाघोडे, माजी सदस्य काशीराम साबळे, महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष प्रतिभा अवचार, आदिवासी संघटनेचे अजाबराव उइके, माजी नगराध्यक्ष बुऱ्हान ठेकेदार, माजी सरपंच सुरेश ओंकारे यांच्यासह अनेक स्थानिक प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
MLA Sajid Khan Pathan : नेते म्हणाले, महावितरणचीच वीज खंडीत करणार!
पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा आदी भागांतील कार्यकर्त्यांचाही यात समावेश होता. या प्रसंगी आमदार शिवाजीराव गर्जे, इद्रिस नायकवडी, अमोल मिटकरी, माजी आमदार अतुल बेनके, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुज्जमा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Eknath Shinde Shiv Sena : माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, जबाबदारीही मिळाली!
या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अकोला जिल्ह्यात नवी ऊर्जा व जनाधार प्राप्त झाला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. “अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.