Vanchit Aghadi is unhappy on Anandraj Ambedkar’s alliance with Shinde Sena : आनंदराज आंबेडकरांचे शिंदेंच्या सेनेसोबत जाणे आवडले नाही, बैठकीत व्यक्त झाली नाराजी
Akola शिंदेसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेत झालेल्या युतीनंतर, वंचित बहुजन आघाडीने आता रिपब्लिकन सेनेपासून पूर्णतः अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत बुधवारी (दि. १६ जुलै) घेण्यात आला. या बैठकीस वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षता केली.
शिंदेसेना ही भारतीय जनता पक्षाच्या महायुतीतील घटक असून, अशा पक्षाशी रिपब्लिकन सेनेने युती केल्यामुळे ‘वंचित’ने यास “दुर्दैवी पाऊल” असे संबोधले आहे. गेल्या सात दशकांपासून फुले, शाहू आणि आंबेडकरी चळवळीने संविधान न मानणाऱ्या शक्तींशी कधीही हातमिळवणी केली नाही. याच परंपरेनुसार, भाजपा व रा.स्व.संघाशी जवळीक साधणाऱ्या रिपब्लिकन सेनेपासून आता ‘वंचित’ने फारक घेण्याचे ठरवले आहे.
Chandrashekhar Bawankule : कामठीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरसावले गडकरी!
आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असले तरी, त्यांची भूमिका व विचारधारा संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या शक्तींच्या जवळ गेल्याचा ठपका ‘वंचित’ने ठेवला आहे. यापुढे ‘वंचित बहुजन आघाडी’चा रिपब्लिकन सेनेशी कोणताही राजकीय संबंध राहणार नाही, असे बैठकीत ठामपणे जाहीर करण्यात आले.
Adivasi Pardhi Vikas Parishad : पारधी समाजाची घरे पूर्वसूचना न देताच पाडली, स्वप्नांचा चुराडा
रिपब्लिकन सेनेला ‘वंचित’चा ठाम विरोध
बैठकीत पुढे म्हटले आहे की, “ज्या कोणत्याही संघटना रा.स्व.संघ, भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी युती करतील, त्या फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीच्या विरोधात जातील. त्यामुळे रिपब्लिकन सेनेला ‘वंचित’चा यापुढे ठाम विरोध असणार आहे.”