Vasudha Deshmukh : माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा अन् सोशल मीडियावर खळबळ!

Rumors of Former Minister’s Death Create Stir on Social Media : उपचारानंतर प्रकृती स्थिर, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

Amravati माजी मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ. वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांच्या निधनाची अफवा सोमवारी सोशल मीडियावर वेगाने पसरल्यानंतर अमरावतीच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. काही वेळातच ही बातमी विविध सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली. मात्र, काँग्रेस पदाधिकारी आणि वसुधाताईंच्या निकटवर्तीयांनी तत्काळ पुढे येत या बातमीचे खंडन केले.

अमरावतीतील राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी करण्यास रुग्णालयाशी संपर्क साधला. नंतर स्पष्ट झाले की, वसुधाताई देशमुख यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Tribal leaders unite : मंत्र्यांसह आदिवासी नेते एकवटले तीव्र आंदोलनाचा इशारा

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारींनी सोशल मीडियावर स्पष्ट निवेदन जारी करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि वसुधाताईंच्या कार्यशैलीशी परिचित असलेल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, “वसुधाताईंची प्रकृती सुधारत आहे. सोशल मीडियावर पसरलेली बातमी ही पूर्णपणे चुकीची असून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी,” अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, सोशल मीडियावर अफवांमुळे झालेल्या या गोंधळानंतर नागरिकांनी अधिकृत सूत्रांद्वारे माहिती घेण्याची गरज व्यक्त केली.