A body was found in a dismembered state in the Dhondgaon area : धोंडगाव परिसरात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
Wardha News : रस्ता ओलांडत असताना वाघिणीच्या चार महिन्यांच्या शावकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी २२ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास समुद्रपूर-गिरड परिसरात धोंडगावच्या समोर मुनेश्वर नगर जवळील मार्गावर घडली. शावकाचा मृतदेह रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली आहे. मागील एका ते दोन महिन्यांपासून एक वाघीण व तिच्या चार शावकांचा गिरड, खुर्सापार परिसरात मुक्त संचार सुरु होता. यामुळे सर्वच सतर्क झाले होते. खुर्सापार, गिरड, पेठ, आर्वी, फरीदपूर, मोहगाव येथील शेतकऱ्यांसह नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहनदेखील वनविभागाच्यावतीने करण्यात आले होते.
Anand Paranjape : माध्यम प्रतिनिधिंनी चुकीच्या, खोडसाळ बातम्या चालवू नये !
२० ट्रॅप कॅमेऱ्यांतून हालचाली कैद
वनविभागाकडून तीन शावकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययाेजना राबवल्या गेल्या. शेतकऱ्यांच्या शेतात रात्रीचा वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती विद्युत विभागाला केली होती. परिसरात तब्बल २० ट्रॅप कॅमेरे लावून प्रत्येक हालचाली टिपल्या जात होत्या. त्यात वाघीण व तिचे चार शावक दिसून आल्याने गस्तही वाढविली होती.
शेतकऱ्यांनो, शेतात जाऊ नका
शावकाचा मृत्यू झाल्याने वाघीण आता चवताळली व बिथरलेली आहे. ती आता कोणावरही हल्ला करु शकते. त्यामुळे धोंडगाव, हुसेनपूर, शिरपूर, भवानपूर, हिवरा, वडगाव, अंतरगाव, गिरड व परिसरातील शेतकरी, मजूरवर्ग, नागरिकांनी सतर्क राहवे. तसेच धोंडगाव येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी शेतात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
Congress movement : लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार !
गिरडच्या वननिरीक्षण कुटीत अंत्यसंस्कार
मृत शावकावर गिरड येथील वननिरीक्षण कुटीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक हरवीरसिंग, उपवनसंरक्षक अमरजीत पवार, एनटीसीएचे बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर, कौस्तुब गावंडे, डॉ. ज्योती चव्हाण, डॉ. कल्याणी लोथे, डॉ. अरुण तुराले, योगेश भोरते, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, क्षेत्र सहायक राजू धनवीज, प्रभाकर नेहारे आदी उपस्थित होते. एनटीसीएच्या मार्गदर्शनात अंत्यविधी पार पडला. मृत शावक हे मादी असल्याचा प्राथमिक अंदाज उपवनसंरक्षक अधिकारी अमरजीत पवार यांनी व्यक्त केला.