Breaking

Vidarbh Farmers : महागाईने मोडले कंबरडे; शेती करणे झाले अवघड!

 

Farming became difficult : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार

Wardha वातावरणात होणारे बदल तसेच दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता शेती करणे अवघड झाले आहे. अशातच आता १ जानेवारीपासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. कच्चा मालाच्या किमती वाढल्यामुळे खतांच्या दरात वाढ झाली आहे.

संयुक्त खतांच्या ५० किलोच्या पिशवीमागे २४० ते २५५ रुपयांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, ते चिंताग्रस्त झाले आहेत. रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारीपासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते ३०० रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

Solar Village : हे आहे विदर्भातील ‘मॉडेल सोलर व्हिलेज’!

शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायेाबीन दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबविली होती. मात्र, उलट दर कमी झाले. आता खतांच्या किमती वाढल्याने चांगलेच कंबरडे मोडले आहे. वाढीव दरानुसार डीएपी खताची किंमत प्रतिपिशवी १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपये झाली आहे. टीएसपी ४६ टक्के खताची किंमत १,३००ऐवजी १,३५० तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १,४७० रुपयांवरून १,७२५ रुपये झाली आहे.

Sant Gadge Baba Amravati University : तर बहुजन समाज पुन्हा शिक्षणापासून वंचित राहिल

शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. रासायनिक खतांचे दर अगोदरच जास्त आहेत. त्यात पुन्हा किमती वाढून शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड बसणार आहे. रासायनिक खतांचे वाढते दर पाहता भविष्यात शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा वापर वाढवावा लागणार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. मात्र, दुधालाही दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हा धंदा बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढू लागल्या आहेत.

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करावा, अशी मागणी केली जाते, तर दुसरीकडे वर्षाला खतांच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. शेणखताचा शेतात वापर केल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेणखत खरेदीला शेतकऱ्यांची जास्त मागणी आहे. त्यामुळे किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे