Vidarbh politics : विदर्भ प्रत्येक वेळी कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही !

Ajit Dada refuses to accept BJP, Fadnavis’ dominance : अजित दादांचा भाजप, फडणवीसांचे वर्चस्व मानण्यास नकार

Mumbai : विदर्भ प्रत्येक वेळेस कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही. विदर्भाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निकाल दिल्याचे आजवरचे अनुभव आहे, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विदर्भ भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असल्याचे मानण्यास नकार आहे का, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त वाटा हवा आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

विदर्भ देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय गड मानला जातो. याच भागातून राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी चिंतन शिबिरांना सुरुवात केली आहे. यामागे काही खास रणनीती आहे का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी विदर्भ कुठल्याही एका पक्षाचा कायमस्वरूपी बालेकिल्ला मानता येत नाही, असे स्पष्ट केले. त्यांनी आठवण करून दिली की, विदर्भाने प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे निकाल दिले आहेत आणि आज भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या अपेक्षेने काम करत आहेत. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतील, असेही ते म्हणाले.

NCP Strategy Workshop : ‘ती’ जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची !

विशेष म्हणजे, काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी असल्याचा दावा केला होता. विधानसभा निवडणुकीत आठ जागांवर उमेदवारी देऊन सात जागा जिंकल्या आणि 90 टक्के यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे ते म्हणाले.

Jigao Project : जिगाव प्रकल्पग्रस्तांचे अर्धनग्न आंदोलन

अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांच्या विधानांमधून राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला महत्त्व देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामागे महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवणे, हा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.